पुण्यामध्ये पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/umesh-raut_201808117270.jpg)
पुणे – डेक्कन पोलीस ठाण्यात नेमणूकीला असलेले पोलीस हवालदार उमेश राऊत (45) यांनी बुधवारी (8 ऑगस्ट) रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वारगेट पोलीस लाईन बिल्डिंग नंबर 6 येथे रात्री साडेअकरा वाजता ही घटना उघडकीस आली. घरगुती कारणामुळे राऊत यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश राऊत हे स्वारगेट येथील पोलीस लाईनमध्ये राहतात. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी गुजरात येथे असतो. डेक्कन पोलीस ठाण्यात त्यांच्याकडे कोर्ट ड्युटीचे काम होते. रात्री नेहमीप्रमाणे ते घरी आले़ त्यानंतर पती पत्नीत भांडणे झाले. त्याचदरम्यान उमेश राऊत यांनी बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ बाथरुममधून बाहेर न आल्याने त्यांच्या पत्नीने हाक मारली. तरीही प्रतिसाद न दिल्याने शेवटी दरवाजा उघडल्यावर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले़.