breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुण्यानंतर आता हिंजवडी परिसरात रानगव्याचा ‘गवगवा’

पिंपरी |महाईन्यूज|

कोथरूड व बाणेर अशा दोन ठिकाणी रानगव्याने दर्शन दिले होते. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आज हिंजवडी परिसरातील माणगाव येथे एका शेतकरी कुटुंबाला रानगवा दिसला आहे. रानगव्याच्या दर्शनाने मात्र परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आयटीनगरीतील माणमध्ये गव्याचे दर्शन झाले. पहाटे साडेपाचच्या सुमारास येथील राक्षेवस्ती येथे हा रानगवा आढळून आला. पांडुरंग राक्षे म्हणाले, पहाटेच्या सुमारास कामाला असणाऱ्या गड्याने गोठयातील बैल सोडून बाहेर बांधले, त्यांना चारा घेऊन तो आला असता गवा बैलांशेजारी गवा उभा असल्याचे त्याने पहिले. सुरवातीला धुक्यामुळं आम्हाला समजलं नाही मात्र मॉर्निंग वॉक करुन परतलेल्या जयवंत राक्षे यांनी गवा असल्याचे ओळखताच आम्ही घरात धाव घेतली. आरडा ओरडा झाल्याने गवा नदीच्या दिशेने शांत पणे निघून गेला असं पांडुरंग राक्षे यांनी सांगितले.  

दरम्यान, खाण्या पिण्याचा ओढीने अथवा इतर जनावरांची चाहूल लागल्याने तो नदीकडून राक्षे वस्तीकडे आला असावा असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करत असून नववर्षाच्या सुरवातीलाच माणमध्ये रानगवा आल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच गव्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button