breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात वारजे पुलावरून बस कोसळली ; १७ जण जखमी, एक गंभीर

पुणे –  कात्रजहून निगडीकडे जाण्याऱ्या पीएमपीएल बसला वारजे पूलावर अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस वारजे पूलावरुन खाली कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी कात्रज – निगडी  एमएच 14 सीडब्ल्यू 3088 ही बस निगडीकडे भरधाव वेगाने निघाली होती. सकाळी अकरा वाजता बस वारजे गावाजवळ पोहोचली. त्यावेळी भरधाव वेगाने असणारी बस चालकांचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने अचानक बस डाव्या बाजूने पुलावरील रस्त्याच्या खालील जाऊन पडली. प्रवाशांनी आगोदरच खचाखच भरलेली बस पडल्याने अनेक प्रवाशांना जबर मार लागला. या अपघातामध्ये 17 लोक जखमी, एक गंभीर अन्य 16 किरकोळ जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना जवळील माई मंगेशकर रुग्णालय तर काही प्रवाशांना शहरातील रुग्णालयात हलविण्यात आले.

बस पुलावरील रस्त्याच्या खाली पडली. तेथील खड्डा अर्धा फुट खोल आहे. मात्र त्यापुढे काही अंतरावर पुलाची खोली तब्बल 20 फुट आहे. याच पुलाच्या खाली कामगारांच्या 8 ते 10 झोपड्या आहेत. बहुतांश कामगार सकाळी कामासाठी लवकर बाहेर पडतात. आजही सर्व कामगार कामाला गेले होते. बस खाली कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी सद्यस्थिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button