breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात काॅंग्रेसकडून प्रचाराला सुरुवात, पण प्रचार कुणाचा करायचा, यावर कार्यकर्ते संभ्रमात

पुणे – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय, रखरखत्या उन्हाबरोबर राजकीय वातावरण तापू लागले आहे. काॅंग्रेस-राष्ट्रवादीने राज्यातील अनेक जागांवर उमेदवार जाहीर केले. विरोधकांनीही आपआपले उमेदवार जाहीर करुन प्रचाराला प्रारंभ केला. परंतू, मात्र, पुण्यात काँग्रेस आघाडीने उमेदवाराविनाच प्रचाराला सुरुवात केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना उमेदवार जाहीर न झाल्याने प्रचाराला उशीर होत आहे. म्हणून उमेदवाराविनाच काँग्रेस आघाडीने प्रचाराला सुरुवात केली. आज कसबा गणपतीला नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. मात्र, नेमका प्रचार कुणाचा करायचा याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीने बहुतेक जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर पक्षांच्या प्रचारालाही सुरुवात झाली. मात्र, आघाडीचा पुणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे. पुण्याहून युतीने पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, आघाडीने अद्यापही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. आघाडीकडून पुण्याच्या जागेसाठी माजी आमदार मोहन जोशी, महापालिका गटनेते अरविंद शिंदे आणि संभाजी ब्रिगेडमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रविण गायकवाड यांची नावं चर्चेत आहेत.

या तिघांपैकी माजी आमदार मोहन जोशी यांचं नाव मागे पडलं आहे. मात्र, अरविंद शिंदे आणि प्रविण गायकवाड यांच्यापैकी कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत आघाडी अद्याप निर्णय घेऊ शकलेली नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच प्रचाराला उशीर होत असल्याने कार्यकर्त्यांनी कसबा गणपतीला नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेश केला. उमेदवाराविनाच प्रचाराला सुरुवात व्हावी, असे संपूर्ण देशात पहिल्यांदाच होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button