Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
पुण्यातील हे चार मतदार संघ राष्ट्रवादीकडे राहणार, अजित पवार यांची घोषणा
![Ajit Pawar used to be a bomb at petrol pumps: Deputy Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/1556014904-Ajit_Pawar.jpg)
पुणे, महाईन्यूज,
पुण्यातील पर्वती, हडपसर, वडगावशेरी आणि खडवासला हे चार विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांनी आज पुण्यात केली. त्यामुळे कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोमेंट आणि कसबा विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे किंवा मित्र पक्षाचे उमेदवार निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
पुण्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली. यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पार्टीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.