पुण्यातला पाणीपुरवठा ११ फेब्रुवारीला राहणार बंद
![The water supply to Pune city will be closed for full day on Thursday. Relevant information has been given by the Information and Public Relations Office, Pune Municipal Corporation.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/no-water-715x400.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुणे शहराच्या भागाचा पूर्ण दिवसाचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याबाबत माहिती व जनसंपर्क कार्यालय पुणे महानगरपालिकेकडून संबंधित माहिती देण्यात आली आहे. गुरूवारी ११ फेब्रुवारीला वडगांव जलकेंद्र परिसर व चतुःश्रृंगी /एस.एन.डी.टी/ वारजे जलकेंद्र परीसर येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्याकारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पुणे शहराच्या भागाचा पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी १२ फेब्रुवारीला सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग –
वडगांव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगांव पठार, दत्तनगर ,धनकवडी, कात्रज , भारती विद्यापिठ परिसर, कोंढवा बु इत्यादी. चतुःश्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर : पाषाण , औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक इ. परिसर किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परीसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परीसर, वारजे हायवे परीसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्लयुलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड परीसर इत्यादी.