breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुण्याचे विभागीय आयुक्तही कोरोना पाॅझिटिव्ह; कोरोना झपाट्याने वाढतोय

पुणे |महाईन्यूज|

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेल्या नव्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आज (मंगळवारी दि.16) कोरोना पाॅझिटिव्ह झालेला आकडा 1925 वर पोहोचला आहे. विशेषता कोरोना काळात प्रशासकीय जबाबदारी पेलणारे विभागीय आयुक्त सौरभ राव (Pune divisional commissioner Saurabh Rao) यांनाही कोरोनाने गाठलं आहे.

सौरभ राव यांच्यावर पुण्यासह कोल्हापूर ,सातारा ,सांगली ,सोलापूर या 5 जिल्ह्यांची जबाबदारी आहे. राव हे विभागीय आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. देशातील सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आणि जिल्ह्यात आढळत आहेत. त्यामुळे पुणेकरांसाठी कोरोना विषाणूही चिंतेची बाब बनत चालली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा, असा केंद्राचा राज्य सरकारला धोक्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील 18 वर्षे आणि पुढील सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यात यावी, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. पण सध्या सुरू असलेल्या लसीकरण प्रक्रियेत मात्र अजूनही गोंधळच सुरू आहे.

पुण्यात लशींच्या पुरवठ्यावरून सोमवारी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हीच गोंधळाची परिस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम होती. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड (Covishield) ऐवजी भारत बायोटेकने बनवलेल्या covaxinचा साठा मिळाल्याने नियोजित लसीकरणामध्ये (Pune Corona Vaccination) मोठा अडथळा आला. नियोजित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अचानक लसीकरण रद्द झाल्याचे एसएमएस मोबाईलवर मिळाले आहेत. ज्यांची लसीकरणाची वेळ उद्या निश्चित करण्यात आली होती त्यांनाही अशाच पद्धतीचे मेसेज आले आहेत आणि लसीकरणासाठी पुन्हा नव्याने नोंदणी करून वेळ निश्चित करून घेण्यास सुचवण्यात आलं आहे. या सगळ्या प्रक्रियेमुळे आज लसीकरणामध्ये दिवसभर मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button