breaking-newsपिंपरी / चिंचवड

पुणे शहरातून पिंपरीत ये-जा करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना थांबवा, नगरसेविका सिमा सावळे यांची मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कामानिमित्त रोज पुणे शहरातून पिंपरी चिंचवडला येणाऱ्या पालिका सरकारी कर्मचाऱ्यांना थांबवा अशी मागणी महापालिकेतील भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी केली आहे. या विषयावर त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदन दिले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई शहरातून कामासाठी ठाणे- कल्याण- डोंबिवली येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिका आयुक्तांनी ८ मे पर्यंत बंदी घातली आहे. हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. याच पध्दतीने पुणे शहरातून रोज शेकडो कर्मचारी पिंपरी चिंचवड शहरात येत असतात. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका संभवतो. पुणे शहरात कोरोनाचा प्रकोप झाला आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता रोज पुणे ते पिंपरी चिंचवड असा प्रवास म्हणजे एक प्रकारे कोरोना प्रसारणाला प्रोत्साहन आहे, असे सावळे यांनी निदर्शनास आणून दिले. या बाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना होऊ घातलेला संभाव्य धोका टाळावा असे सावळे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button