breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे-लोणावळा लोकल गुरूवारपासून पुन्हा धावणार

पुणे / पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे-लोणावळा लोकल येत्या गुरुवारपासून (दि. 8) पुन्हा धावणार आहे. मात्र, तूर्तास अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची अनुमती मिळणार आहे. त्याबाबतची नियमावली एक-दोन दिवसांत नोडल ऑफिसर असणारे पुण्याचे पोलीस आयुक्त जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंधांसह पुणे परिसरातील लोकल ट्रेन सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मिशन बिगिन अंतर्गत जारी करण्यात आलेल्या आदेशात यासंदर्भातील उल्लेख आहे. मुंबई महानगर क्षेत्राच्या धर्तीवर पुणे क्षेत्रातील लोकल ट्रेन सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

यामुळे पुणे- लोणावळा या लोहमार्गालगत राहणाऱ्या लोकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. राज्य शासनाने अनलॉक 5 ची नियमावली आणि आदेश जाहीर केले आहेत. हा अनलॉक 5 हा 1 ते 31 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. यामध्ये राज्यातील लांब पल्ल्याच्या रेल्वे देखील सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

पुण्यातील लोकलसेवा सुरू करतानाच कोरोनाच्या अनुषंगाने काळजी, खबरदारी घेण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button