पुणे, बारामती, शिरूर आणि मावळमधील मतदानाची तारीख बघा
पुणे : देशभरात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान मतदान होणार असून, या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे. तसेच ”पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान 23 एप्रिलला घेतले जाणार आहे”, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (रविवार) दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर, पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाची माहिती दिली आहे. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. तर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान घेतले जाणार आहे.
दरम्यान, पुण्यात एकूण मतदार 20 लाख 24 हजार 731 मतदार आहेत. त्यासाठी एकूण एक हजार 944 मतदान केंद्रांची स्थापना केली जाणार आहे.