Breaking-newsपिंपरी / चिंचवड
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा सन्मान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/IMG-20190803-WA0037.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांची निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या वतीने महासंघाचे वरिष्ठ संचालक सुभाष ढवळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महासंघाचे वरिष्ठ संचालक अनिल असगेकर, गणेश रेसिडेन्सिचे चारुहास कुलकर्णी , स्मिता सहस्त्रबुद्धे, महासंघाचे पदाधिकारी आणि सोसायटीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते काटे म्हणाले की, सोसायटीतील नागरिकांच्या महापालिकेशी संबंधीत समस्या सोडविण्यावर भर देणार आहे. आपला परिसर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो. सोसायट्यांसह परिसरातील नागरिकांना कोणत्याच गोष्टींची कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही काटे यांनी यावेळी केली.