breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुढच्या वर्षीपासून पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हल भरणार; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय?

पिंपरी (महा ई न्यूज) – जयंत्या आणि उत्सव साजरे करण्यासंदर्भात न्यायालयीन निर्बंध आहेत. यापुढे नियमाचा अवमान न होऊ देता पुढच्या वर्षीपासून पिंपरी-चिंचवड गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महापौर राहूल जाधव आणि पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितली.

उत्सव, जयंत्या साजरे करण्यासंदर्भात कायद्यातून मार्ग काढण्यासाठी आज शुक्रवारी (दि. 28) महापालिकेतील सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात बैठक झाली. बैठकीत महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, नामदेव ढाके, तुषार कामटे, विनया तापकीर, सुलक्षणा धर आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले की, पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टीव्हल भरविण्यात येणार आहे. मात्र, कायद्याचे निर्बंध असल्याने काही मर्यादा येत आहेत. त्यातुनही कायद्याचा अवमान न होऊ देता, मार्ग काढण्यात येणार आहे. या फेस्टीव्हलमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा समावेश करण्यासंदर्भात विचारविनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे. यावर्षी ज्या गणेश मंडळांनी प्रबोधनात्मक देखावे सादर करून समाजिक कार्य केले आहे. अशा मंडळांना पुढच्या वर्षी बक्षिसे दिली जाणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button