breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘पीएमपीएमएल’च्या संचालक पदाचा राजीनामा देणार – महापाैर राहूल जाधव

पीएमपीएमएलच्या वाहतूक व्यवस्थापक पदावरुन सुनिल गवळींना हटविण्याची मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  ‘पीएमपीएमएल’मधील गैरव्यवहार प्रकरणात खातेनिहाय चौकशी सुरू असेलल्या सुनील गवळी यांच्याकडे वाहतूक व्यवस्थापकपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यावरून पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पीएमपीला कुठलाही निधी न देण्याची घोषणा केली असून  सुनील गवळी यांना पदावरून दूर न केल्यास पीएमपी संचालकपदाचा राजीनामा देण्याची घोषणा महापौर जाधव यांनी शुक्रवारी (दि.4) पत्रकार परिषद केली.

पुणे महानगर परिवहन मंडळ लि. (पीएमपीएमएल) कंपनीतील सुनील गवळी यांच्यावर गैरव्यहाराचा आरोप आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु आहे. चौकशीचा अहवाल येईपर्यंत गवळी यांच्याकडे वाहतूक व्यवस्थापक पदाचा पदभार देवू नये, अशी मागणी महापौर जाधव यांनी केली आहे. तसा पत्रव्यवहार त्यांनी पीएमपीएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांच्याकडे केला. मात्र, तो पदभार काढण्याबाबत त्यांची भूमिका नकारात्मक असल्याने महापौरांनी संताप व्यक्त केला आहे. 

पीएमपी व्यवस्थापनात जर कोट्यवधींचा घोळ करणारे अधिकारी कारभार चालवत असतील, तर पीएमपी आणखी तोट्यात जाणार आहे. त्यांना निधी दिल्यास त्याचा सदुपयोग होणार नाही. त्यामुळे पीएमपीला आता पिंपरी महापालिकेकडून कुठलाही निधी दिला जाणार नाही. तसेच, सुनील गवळी यांचा पदभार पीएमपीएमएलने काढून न घेतल्यास पीएमपी संचालकपदाचा राजीनामा देण्याची घोषणा महापौर जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button