Breaking-newsपिंपरी / चिंचवड
पिस्तुल बाळगल्याने एकाला पोलिसांकडून अटक
पिंपरी |महाईन्यूज|
पिस्तुल बाळगल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
गणेश मारूती माळी (वय 26, रा. महादेव मंदीराजवळ, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (ता. 6) सायंकाळी साडेचारच्या सुमारास काळेवाडी येथील एका बेकरीसमोरील रस्त्यावर माळी हा पिस्तुलासह उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 27 हजार 500 रूपये किंमतीचे एक गावठी पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे व पिस्तुल सारखे दिसणारे एक लायटर सापडले. याप्रकरणी वाकड पोलिसांनी माळी याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.