breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपळे निलख येथे अमेरिकन डॉलरसह 14 लाखांची घरफोडी

पिंपरी : अमेरिकन डॉलरसह 4 लाखांची रोकड, घड्याळे, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप व एटीएम कार्ड असा 14 लाख 40 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी कडीकोयंटा उचकटून लंपास केला. ही घटना पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटीत सोमवारी रात्री घडली.

याबाबत ललिता दीपक बागवे (वय 62, रा. बंगला नंबर 22, रक्षक सोसायटी, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिता बागवे यांचे पती थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्या रुग्णालयात होत्या. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेत असल्याने त्यांच्याकडे अमेरिकन डॉलर होते. मात्र, चोरट्यांनी डॉलरही चोरून नेले. दरम्यान, सांगवी पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही हस्तगत केले असून पुढील तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button