breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी विधानसभा मतदारसंघात बोगस मतदान केलेले पाच जण ताब्यात

पिंपरी – पिंपरी मतदारसंघातील पिंपरी गाव येथील विद्यानिकेतन शाळेतील बुथ क्रमांक 303 येथे काही परप्रांतीयांनी बोगस ओळखपत्रे दाखवून मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या पाच जणांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पिंपरी पोलिसांनी या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. बोगस मतदान होत असल्याची तक्रार आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मतदान अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मराठी मतदारांच्या नावावर परप्रांतीयांनी मतदान केल्याने ही बाब निदर्शनास आली, तसेच आम्ही मतदान केले आहे, असे संबंधितांकडून कबूल करण्यात येत आहे, त्यामुळे पिंपरी गावातील या मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी येथे गर्दी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button