breaking-newsपिंपरी / चिंचवड
पिंपरी युवासेनेच्या वतीने बालदिन उत्साहात साजरा
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवहारलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभर बाल दिन साजरा होतो. त्यानिमित्ताने पिंपरी युवासेना व शिवसेना शाखा फुगेवाडीच्या वतीने येथे लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा फुगेवाडीच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी युवासेनेचे विभाग प्रमुख निलेश हाके, प्रभाकर हिंगे, बाबू बापूर, प्रमोद शिंदे,अविनाश जाधव, विकास गायकवाड, शैलेश हाके, चिंचपा निंगडोळे, मनोज काची, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.