पिंपरी महापालिकेच्या सत्ताधारी भाजपचा निषेध नोंदवून मनुस्मृतीचे दहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/10-3.jpg)
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात महापालिकेने उभारलेल्या भीमसृष्टी प्रकल्पात मनृस्मृती दहनाचे शिल्प वगळण्यात आले आहे. मनृस्मृती दहनाचे प्रसंग वगळण्यात आल्याने विविध संघटनांनी एकत्र येवून महापालिकेच्या सत्ताधारी भाजपचा निषेध व्यक्त करुन मनुस्मृतीचे दहन करण्यात आले आहे.
पिंपरीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (बधुवार) निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मानव कांबळे, मारुती भापकर, नगरसेविका सुलक्षणा धर, गिरीश वाघमारे, नकुल भोईर, प्रदीप पवार, विष्णू मांजरे, विजय गेडाम, संतोष जोगदंड, धम्मराज साळवे, ॲड. लक्ष्मण रानवडे, सिद्धीकभाई शेख, श्याम घोडके, अजीज शेख आदी उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या जीवनामधील एक ऐतिहासिक व महत्त्वाचा प्रसंग म्हणून मनुस्मृती दहन या सामाजिक क्रांतीच्या घटनेला इतिहासात विशेष महत्त्व आहे. मात्र सत्ताधारी भाजपने जाणिवपूर्वक हा प्रसंग भीमसृष्टीतून वगळला असल्याचे मानव कांबळे यांनी नमूद करून जोपर्यंत या प्रसंगाचे शिल्प उभे राहात नाही, तोपर्यंत हा निषेध व मनुस्मृती दहन केलेच जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/WhatsApp-Image-2019-12-25-at-12.15.41.jpeg)
यावेळी मारुती भापकर यांनी महापालिका प्रशासन, सत्ताधारी पदाधिकारी तसेच या प्रकल्पाच्या उद्घाटनाला आलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना सांगूनही या महापालिकेचे लबाड आयुक्त श्रावण हर्डिकर हे शिल्प उभारत नसल्याचे सांगितले.