breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी ते दापोडीपर्यंत मेट्रोचे 52 टक्के काम पुर्ण

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  दापोडी ते पिंपरी या मार्गावरील मेट्रोचे ५२ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित स्पॅन, स्टेशन, ट्रॅक व विद्युतविषयक अशी सर्व कामे येत्या दहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले. 

दापोडी ते पालिका भवनासमोर पालिका भवन स्टेशन हे अंतर ६.७ किलोमीटर इतके आहे. या मार्गावरील एकूण २८६ पैकी २५८ फाउंडेशन घेण्यात आले आहेत. अद्याप ३० फाउंडेशन घेणे शिल्लक आहे. त्यातील सर्वांधिक फाउंडेशन नाशिक फाटा चौकात असून, पिंपरी व मोरवाडी चौक, खराळवाडी येथील फाउंडेशनचे काम सुरू करणे शिल्लक आहे. नाशिक फाटा येथे ५ ड्रायपॉडने पायलिगचे काम सुरू आहे. तर, एकूण १९२ पैकी २५८ पिलरचे उभे केले गेले आहेत. तर, १४१ पिलर तयार झाले आहेत.

पिंपरी व दापोडी स्टेशनचे काम वेगात सुरू आहे. त्यापैकी संत तुकारामनगर येथील पिलर आर्मवर स्पॅनची जुळवणीचे काम नुकतेच सुरू झाले आहे. त्यावर प्लॅटफार्म पिअर आर्मचे कामही सुरू करण्यात आले आहे. तर, एकूण ८९ स्पॅनची जुळवणी पूर्ण झाली असून, हे अंतर २.६ किलोमीटर इतके आहे. स्पॅनवर विद्युतविषयक कामासाठी केबल व खांबाचे काम संबंधित कंपन्यांमध्ये तयार केले जात आहे. ट्रॅक टाकण्याची निविदा अद्याप सुरू असून, एप्रिलपासून काम सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो मार्गासाठी वीज पुरवठा करण्यासाठी वल्लभनगर एसटी आगार येथे पॉवर सबस्टेशन सुरू करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button