breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी सायंकाळचा पाणी पुरवठा बंद
![The water supply to Pune city will be closed for full day on Thursday. Relevant information has been given by the Information and Public Relations Office, Pune Municipal Corporation.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/no-water-715x400.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणि रावेत पंपींग स्टेशन येथे दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात गुरूवारी (दि.7) सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि.8 ) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.
महापालिकेने 1 मार्चपासून आठवड्यातून विभागनिहाय एकदा पाणीकपात सुरू केली आहे. ज्या भागांत बुुधवारी (दि.6) व शुक्रवारी (दि.8) पाणी बंद असते. त्यादिवशी त्या भागात नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी केले आहे.