breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवड शहराची “तहान’ टॅंकरवर!

पालिकेच्या पाण्याची होतेय विक्री, खासगी टॅंकर सप्लायर्सने मांडलाय धंदा

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी अजूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. अनेकदा अस्वच्छ, घाण, तांत्रिक कारणाने पाणी पुरवठा विस्कळीत केला जातो. त्या ठिकाणी महापालिका खासगी टॅंकरने पाणी पुरवठा करते, मात्र, वाकड, पिंपळे गुरव, सांगवी, भोसरी, चिखली, चऱ्होली, मोशी, थेरगाव आदी भागात नागरिकांना टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. शहरातील खासगी टॅंकर सप्लायर्स दररोज शेकडो पिण्याच्या पाण्याच्या खेपा मारतात. हे टॅंकर पालिका हद्दीबाहेर जावून पाणी पुरवठा करतात. त्यामुळे खासगी टॅंकर सप्लायर्स महापालिकेच्या पाण्याची विक्री करत आहेत का? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 96 टक्‍के पाणी साठा आहे. त्यातून मावळातील गावांनाही पाणी पुरवठा केला जातो. यामुळे उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य नियोजन होवूनही पाण्याचे कृत्रिम टंचाई जाणविली जात आहे. महापालिका हद्दीच्या सामाविष्ट गावांतील अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. शहरात काही छोट्या-मोठ्या नागरी वस्त्यांवर पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.

महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा सुरळीत होत असल्याच्या वल्गना केल्या, तरी अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय, तर काही ठिकाणी पाणी पुरवठा न झाल्याने टॅंकरने पाणी देण्याची वेळ आली. महापालिका माणसी 135 लीटर पाण्याऐवजी 150 लीटर पाणी देते. तरीही अनेक भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. त्या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी खासगी टॅंकरने पुरवले जात आहे.

खासगी पाणी पुरवठादार पाण्याची विक्री करू लागलेत. तसेच, काही टॅंकर महापालिका हद्दीबाहेरही जावू लागलेत. याबाबत पाणी पुरवठा अधिकारी झोपेचे सोंग घेवून अनभिज्ञ असल्याचे दाखवू लागले आहेत. धरणात पुरेशा पाणीसाठा असतानाही पाणी कपात सुरु आहे. अधिकारी व खासगी टॅंकर सप्लायर्स नागरिकांच्या पाणी टंचाईचा फायदा घेवून व्यवसाय थाटू लागल्याचे दिसत आहे.

टॅंकर सप्लायर्सचा धंदा!
महापालिका संकेत स्थळावर पाणी पुरवठा विभागाने खासगी टॅंकर सप्लायर्सची यादी दिली आहे. नागरिकांकडून मिळेल तेवढी रक्कम खासगी टॅंकर सप्लायर्स वसूल करीत आहेत. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहरात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून खासगी टॅंकर सप्लायर्स दापोडी, सांगवी, किवळे, बोपखेल, भोसरी, चऱ्होली, चिखली, मुळशी, थेरगांव यासह अनेक भागांत पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरने नागरिकांना पाणी पुरवठा करीत आहेत. साधारणतः एक टॅंकर दिवसात 7 ते 8 खेपा करतात. एका टॅंकरला 1500 हजार रुपये नागरिकांकडून घेण्यात येत आहेत. परंतु, लांबचा पल्ला, डिझेलचे वाढलेले दर या कारणांनी एका टॅंकरला सुमारे 1500 ते 2 हजार रुपये घेतले जातात. अनेक भागांत टॅंकरने पाणी पुरवत होत आहे. ज्या ठिकाणी पालिकेच्या पाणी पुरवठा टाक्‍या आहेत, तेथूनच पाणी घेवून आम्ही नागरिकांना विकत पाणी देत आहे, असे एका खासगी टॅंकर सप्लायरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button