breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्याकडून महिला कर्मचाऱ्यांचा छळ!

सक्तीच्या रजेवर पाठवा : जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे, आशा शेंडगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे  जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने प्रशासणाकडे लेखी तक्रार केली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून किरण गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे आणि आशा शेंडगे- धायगुडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या पत्रात नगरसेविका सिमा सावळे आणि आशा शेंडगे- धायगुडे पुढे म्हणतात, ” किरण गायकवाड वैयक्तिकरित्या आपली जाणीवपूर्वक छळवणूक करत असून विविध मार्गाने मानसिक त्रास देत असल्याचे `त्या` महिला कर्मचाऱ्याने तक्रार अर्जात म्हटले आहे.  जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. ते सातत्याने अपमान करतात. एकेरी उल्लेख करतात, अर्वाच्च भाषा वापरतात, नियमबाह्य्य कामे सांगतात, मी सांगेन तसे न वागल्यास कारवाई करेन, अशी वारंवार धमकी देतात. कार्यालयीन कामाव्यतिरिक्त “व्हाटस अप” ला संदेश पाठवत राहतात. त्यांचा नंबर ब्लॉक केल्यानंतर त्यांचा त्रास अधिक वाढला आहे. गायकवाड यांच्याकडून आपल्याला प्रचंड त्रास होत आहे”, असा मजकूर तरुणीच्या तक्रार अर्जात नमूद आहे. तसेच किरण गायकवाड यांच्याकडून होत असलेल्या त्रासामुळे माझ्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे देखील या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे, असे सिमा सावळे व आशा शेडगे- धायगुडे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

मानसिक त्रास देऊन आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यामुळे किरण गायकवाड यांना महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले होते. ते प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गायकवाड यांना नुकतेच पुन्हा महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे. निलंबनानंतर पुन्हा रुजू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात किरण गायकवाड यांच्या विरोधात अशा गंभीर स्वरूपाची तक्रार आली आहे. सदर महिला कर्माचाऱ्याने दि. २१ मे २०२० रोजी म्हणजेच सुमारे एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार केली असताना प्रशासनाकडून तातडीने चौकशी होऊन कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण विभाग यांचे दि. ११ जून २०१० रोजी क्र. मकक २०१० / प्र.क्र. ४६ / मकक अन्वये गठीत करण्यात आलेल्या महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) कडे देखील सदर तक्रार करण्यात आलेली आहे. परंतु आजतागायत सदर तक्रार अर्जावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही, हि बाब अत्यंत संतापजनक आहे. वस्तुत: कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल तातडीने घेणे गरजेचे होते मात्र, तसे होताना दिसत नाही.  सदर महिला कर्मचारीने यापूर्वी अतिरिक्त आयुक्तांकडे सदर त्रासाबद्दल तोंडी तक्रार केली होती, परंतु दुर्दैवाने तिने केलेल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली गेली नाही. उलट किरण गायकवाड यांनी त्या महिला कर्मचाऱ्याला धमकावले. “मीच बॉस आहे, माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही, तुला जायचयं तिकडे जा, ” असे दमदाटीवजा शब्द किरण गायकवाड यांनी वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकारची बातमी आजच्या एका स्थानिक वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे महापालिकेची मोठी बदनामी होत आहे, असेही सिमा सावळे आणि आशा शेंडगे-धायगुडे यांनी पत्रात म्हटले आहे.

सदर तक्रारी मध्ये किरण गायकवाड हे कार्यालयीन कामाव्यतिरिक्त त्या महिला कर्मचाऱ्याला “व्हाटस अप” ला संदेश पाठवत राहतात व तिने त्यांचा नंबर ब्लॉक केल्यानंतर त्यांचा त्रास अधिक वाढला आहे, अश्या गंभीर स्वरूपाची बाब उल्लेखित आहे. सदर बाब फौजदारी स्वरूपा गुन्हा आहे. त्यामुळे चौकशी होईपर्यंत किरण गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे व चौकशी अंती दोषी आढळल्यास त्यांना मनपा सेवेतून बडतर्फ करावे. किरण गायकवाड यांच्या विरोधात प्रशासनाकडे प्राप्त तक्रारीची व विशाखा समितीकडे दाखल असलेल्या तक्रारीची देखील सखोल चौकशी करावी हि नम्र विनंती. अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात महिलांचा अवमान कदापी सहन केला जाणार नाही. कारवाई केली नाहीच तर, प्रसंगी आंदोलन करू, याची दखल घ्यावी, असा इशाराही सिमा सावळे व आशा शेंडगे- धायगुडे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button