breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गरजुंना भोजन वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

काळेवाडी ज्योतिबा नगर, नढे नगर, पवना नगर, कोकणे नगर परिसरातील निराधार निरागस ज्यांना रेशनिग कार्ड नाही अशा लोकांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अन्न वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या हेतूने लागू केलेल्या लॉक डाऊनच्या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्यांच्याकडे रेशनिगकार्ड नाही, निरागस आहे. आजच्या दिवशी अशा 900 लोकांना भोईर लॉन्स बीआरटी रोड पवना नगर येथे अन्न वाटप करण्यात आले.

सहकार्य आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लबचे उपसंस्थापक स्वीकृत नगरसेवक विनोद हनुमंत तापकीर, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेविका विमल काळे, प्रतिभा ताम्हणकर, रमेश काळे, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल नढे, राहुल पवार, आबा भोईर, प्रभाग अध्यक्ष विशाल वाळके, भाजप चिटणीस धर्मा पवार, कार्तिक कृष्णन, प्रवीण केमसे, प्रमोद येवले, राहुल द्वारकुंडे, कल्पना काकूंद्रे, रवींद्र पवार, पंकज मिश्र, ज्ञानेश्वर काळे, आकाश भारती, महेश शिंदे, गजानन नढे, अभिषेक वाळके, पालिका अधिकारी व आझाद मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. जोपपर्यंत लॉक डाऊन आहे तो पर्यंत अन्न वाटप करण्यात येणार आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button