पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 6 हजार 628 कोटींचा अर्थसंकल्प स्थायीपुढे सादर
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षांचा मूळ 5 हजार 232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सोमवारी (दि. 17) स्थायी समितीसमोर सादर केला.
स्थायी समितीच्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी होते. यावेळी महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सादर केलेला हा तिसरा अर्थसंकल्प आहे. तर, महापालिकेचा हा 38 वा अर्थसंकल्प आहे.
अंदाजपत्रकाची ही आहेत वैशिष्ट्ये
1) म.न.पा.च्या विकासकामासाठी रु. 1406.90 कोटी इतकी भरीव रकमेची तरतूद केली आहे.
2) क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी तरतूद.
अ क्षेत्रीय कार्यालय- रु. 43.28 कोटी.
ब क्षेत्रीय कार्यालय- रु. 45.96 कोटी.
क क्षेत्रीय कार्यालय- रु. 44.05 कोटी.
ड क्षेत्रीय कार्यालय- रु. 20.02 कोटी.
इ क्षेत्रीय कार्यालय- रु. 18.11 कोटी..
फ क्षेत्रीय कार्यालय- रु.16.70 कोटी.
ह क्षेत्रीय कार्यालय- रु.20.07 कोटी.
ह क्षेत्रीय कार्यालय- रु. 28.76 कोटी.
3) विशेष योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना या लेखाशिर्षावर रु.1161.95 कोटी तरतूद प्रस्तावित
4) शहरी गरीबांसाठी (BSUP) अंदाजपत्रक तरतूद रु 1136.04 कोटी.
5) जेंडर बजेट- महिलांच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद रु. 39.56 कोटी.
6) महापौर विकासनिधीसाठी तरतूद रु. 5.35 कोटी.
7) दिव्यांग कल्याणकारी योजना तरतूद रु. 35 कोटी.
8) पाणीपुरवठा विशेष निधी रु. 217 कोटी.
9) PMPML करीता अंदाजपत्रकात रु. 244 कोटींची तरतूद.
10) नगररचना भू-संपादना करीता रु. 150 कोटी तरतूद.
11) अतिक्रमण निर्मुलन व्यवस्थेकरीता रु. 2.75 कोटी तरतूद.
12) स्वच्छ भारत मिशनसाठी रु. 1 कोटी तरतूद.
13) स्मार्ट सिटीसाठी रु. 150 कोटी तरतूद..
14) मा.प्रधानमंत्री आवास योजना रु.70 कोटी तरतूद.
15) अमृत योजनेसाठी रु. 81.92 कोटी तरतूद.
16) पाणीपुरवठा विभागासाठी रु. 400 कोटी कर्ज रोखे
17) मेट्रोसाठी तरतूद रु.50 कोटी