पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापाैर-उपमहापाैर निवडणुकीचं ठरलं, पिठासीन अधिका-याची नियुक्ती
![Mahalunge police have arrested three people, including a guard, for stealing six bearings of a gear box from a company. A case has been registered against the BJP corporator of Pimpri-Chinchwad Municipal Corporation along with her husband and they are absconding.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/pcmc-bjp-1-696x348.jpg)
निवडीसाठी 22 नोव्हेंबरला विशेष सभा, 18 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापाैर व उपमहापाैर पदाची निवडणुकीसाठी पिठासीन अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 22 नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता विशेष महासभा घेवून त्यात निवड होणार आहे. दरम्यान, 18 नोव्हेंबरला दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी नगरसेविकेनी महापाैर व उपमहापाैर पदासाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीस पिठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल हे कामकाज पाहणार आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आदेश दिले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या निवडीसाठी विशेष सभा घेण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव व उपमहापाैर सचिन चिंचवडे यांचा कार्यकाळ संपत आहे. त्या रिक्त होणाऱ्या जागेवर नव्या महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यात येणार आहे. पिंपरीच्या महापौर पद हे सर्वसाधारण महिला (खुला गट) याकरिता राखीव आहे. यामुळे खुला प्रवर्गातील नगरसेविकेतून प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून सर्वसाधारण महिला खुला गट प्रवर्गातून सत्ताधारी भाजपाच्या तब्बल २१ नगरसेविका निवडून आल्या आहेत. मागील अडीच वर्ष हे महापाैर पद हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नितीन काळजे व राहुल जाधव यांची वर्णी लागली आहे. यामुळे आता चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांची पुढील कार्य काळासाठी वर्णी लागणार आहे. त्यामुळे महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्कंठा शिगेला पोहचली आहे.