पिंपरी-चिंचवड पोलीस बनले ‘स्मार्ट’; ‘व्हाट्सॲप’ वर संवाद साधण्याची सुविधा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/WhatsApp-adverts-1131945.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी व्हाट्स अप क्रमांक सुरु केले आहेत. व्हाट्स अपच्या माध्यमातून नागरिक आपल्या तक्रारी, समस्या पोलिसांना सांगू शकणार आहेत. आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष आणि वाहतूक विभागाने ही सेवा सुरु केली असून काही पोलीस ठाण्यांमध्ये देखील ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना पोलिसांशी संवाद साधणे सुलभ होणार आहे.
शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. शहरातील बहुतांश नागरिक ‘व्हाट्स अप’ वापरतात. आपल्या अडचणी, समस्या, सूचना पोलिसांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविण्यासाठी अनेक नागरिक संकोच करतात. काहीजण भीतीपोटी समस्या सांगण्याचे टाळतात. मात्र, व्हाट्स अपच्या माध्यमातून नागरिक आपल्या समस्या बिनधास्तपणे मांडू शकणार आहेत.
शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या उद्भवते. वाहतुकीचा खोळंबा उडतो. एकेरी वाहतूक, नो पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहनांचे अपघात अशा अनेक समस्या आहेत. त्यात नागरिकांकडून वाहतूक पोलिसांपर्यंत माहिती मिळण्यासाठी या उपक्रमाची मोठी मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्यांनी देखील व्हाट्स अप सेवा सुरु केली आहे. पोलीस ठाणे स्तरावर देखील याचा मोठा फायदा होणार आहे.
- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष :
‘व्हाट्स अप’ क्रमांक – 9529691966
अन्य संपर्क क्रमांक – 100 / 27352500 / 27352600
वाहतूक विभाग :
‘व्हाट्स अप’ क्रमांक – 9529681078
अन्य संपर्क क्रमांक – 27610015
- सायबर विभाग –
26209115
महिला सहाय्यक कक्ष – 27350941
ज्येष्ठ नागरिकांसाठी – 1090
महिलांसाठी – 1091
पोलीस ठाण्याचे संपर्क –
पिंपरी – 27412318, 27420600, 27481056
चिंचवड – 27356768, 27356767
निगडी – 27655088
चिखली – 27492525
देहूरोड – 27671288
तळेगाव – 14222444
तळेगाव एमआयडीसी – 14202333
सांगवी – 27286162
वाकड – 27261120, 27261130
हिंजवडी – 22932119, 22934622
भोसरी – 27124375, 27124728
एमआयडीसी भोसरी – 27130003
दिघी – 29700487
आळंदी – 35232214
चाकण – 35249333