breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत मतदानाचा टक्का वाढतोय
पिंपरी महाईन्यूज
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळी सात पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत पिंपरी 21.70 टक्के, चिंचवड – 26.41 टक्के तर भोसरी – 26.52 टक्के अशी मतदानाची आकडेवारी आहे.
सकाळपासून ढगाळ वातावरण असून तरीही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात 13 लाख 12 हजार 979 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
दुपारी 1 पर्यंत झालेले मतदान
पिंपरी – 21.70 टक्के
चिंचवड – 26.41% टक्के
भोसरी – 26.52% टक्के
सकाळी 11 पर्यंत झालेले मतदान
पिंपरी – 11. 70 टक्के
चिंचवड – 16.37 टक्के
भोसरी – 13.83 टक्के
सकाळी नऊ पर्यंत झालेले मतदान
पिंपरी – 4.01 टक्के
चिंचवड – 6.10 टक्के
भोसरी – 5.11 टक्के