breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नये

सोमवारी (दि.16) कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रूग्ण आढळला नाही.

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि.16) कोरोना विषाणू संसर्गाचा एकही रूग्ण आढळला नाही. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) व भोसरीच्या रूग्णालयात कोरोना बाधीत 9 रूग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर, 17 संशयित रूग्णाचे अहवाल पुण्याच्या एनआयव्हीकडून आलेले नाहीत, असे पालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

शहरात आतापर्यंत एकूण 73 कोरोना संशयित रूग्ण पालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील 50 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. संशयित 17 जणांचे घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले आहेत.

परदेशातून आलेल्या 169 जणांची तपासणी करण्यात आली असून, त्याना 14 दिवस घरात राहून विश्रांती घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यावर पालिकेचे कर्मचारी देखरेख ठेवून आहेत. बाधीत रूग्णांच्या घराच्या आसपास औषध फवारणी केली जात आहे. आतापर्यंत एकूण 20 हजार घरांभोवती फवारणी करण्यात आली आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी. विनाकारण घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button