Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, 193 दुकानदारांविरोधात गुन्हे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/shops.jpg)
पिंपरी – जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्याने तब्बल 98 दुकानदारांवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसात एकूण 193 दुकानदारांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल करत कारवाई केली.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काल मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, यापूर्वीही सर्व अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील दुकानं बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड परिसरात या आदेशाला न जुमानत अनेकांनी आपली दुकानं उघडली. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.