पिंपरी-चिंचवडमध्ये जादूटोण्याचा प्रकार; एकाला अटक
![Type of witchcraft in Pimpri-Chinchwad; One arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/crime-red-theme-5.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
जादूटोणा करण्यासाठी निघालेल्या एकाला चिखली पोलिसांनी अटक केली. गौतम पंढरीनाथ मोरे (वय 41, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्याचे नावे आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई संतोष बाबूलाल बांगर यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी हे रविवारी (ता. 7) पहाटे साडेतीनच्या सुमारास कुदळवाडीतील एचपी पेट्रोल पंपाशेजारी मेन रोडवर गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी एक गाठोडे घेऊन संशयास्पद अवस्थेत जाताना दिसला. पोलिसांनी त्याला हटकले असता, तो पळून जाऊ लागला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली व गाठोड्याची तपासणी केली असता, त्यामध्ये जादूटोणा करण्यासाठी लागणारे साहित्य व एक चाकू आढळला. त्याबाबत त्याला विचारल्यावर त्याने सांगितले, की हे साहित्य मी पूजा करण्यासाठी गोविंद मोरे यांच्या घरी घेऊन चाललो आहे. त्यावरून गोविंद मोरे यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, की गौतम मोरे हा जादूटोणा करण्यासाठी पूजाअर्चा करतो. ‘तुमच्या घरी पूजा केली, तर तुमची प्रगती होईल’, असे गौतम याने मला सांगितल्याचे गोविंद मोरे यांनी पोलिसांना सांगितले.