breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये चार सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या
पिंपरी महाईन्यूज
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चार सहायक पोलिस आयुक्तांच्या सोमवारी (दि. २९) अंतर्गत बदल्या झाल्या. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.
सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांची गुन्हे विभागातून चाकण विभागात, श्रीकांत डिसले यांची वाहतूक विभागातून गुन्हे विभाग ( २) व विशेष शाखेत, नंदकुमार पिंजण यांची वाहतूक विभाग (१ ) व प्रशासन तर नंदकिशोर भोसले यांची विशेष शाखेतून बदली झाली असून त्यांच्याकडे वाहतूक विभाग (२) ची जबाबदारी देण्यात आली आहे.