breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक : भाजपाच्या दोन नगरसेवकांना कोरोनाची बाधा

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे दोन नगरसेवक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून चिंचवडमधील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत शहरातील ४३३७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. नगरसेवकांना देखील कोरोनाची लागण आली आहे. निगडी-यमुनानगरचे भाजप नगरसेवक शुक्रवारी (दि.३) कोरोनाची लागण झाली आहे. तर चिंचवड स्टेशनचे भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचे रिपोर्ट आज (रविवारी) पॉझिटिव्ह आले आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button