पिंपरी चिंचवडमध्ये करोनाचे 36 हजार रुग्ण, चोवीस तासात 23 जणांचा मृत्यू
मंगळवारी दिवसभरात 704 नवीन रुग्णांची भर
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांनी 36 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात आज 704 नवीन रुग्णांची भर पडली. आतापर्यंत शहरात 36,078 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर एकूण 789 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी चार वाजेपर्यंत शहरात 704 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यात शहरातील 681 तर शहराबाहेरील 23 जणांना करोनाची लागण झाली. आतापर्यंत शहरातील एकूण रुग्णांची संख्या 36,078 इतकी झाली आहे. दिवसभरात 23 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील सद्यस्थितीत शहरात 3850 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 468 रुग्णांचाही समावेश आहे.
सोमवारी भोसरी, वाकड, चिंचवड, पिंपरी, निगडी, आकुर्डी, दिघी, कासारवाडी, किवळे, मोशी, दापोडी, चऱ्होली, निगडी, थेरगाव, जुनी सांगवी, पिंपळे गुरव येथील रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 79 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 25,060 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2186 संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या दोन दिवसांतील 3159 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.