breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आला. शहरात आतापर्यंत सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 18 मे रोजी कोरोनाची लागण झालेला एक सहायक पोलीस निरीक्षक कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. या हवालदाराला थेरगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

18 मे रोजी पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका विभागात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली होती. या सहायक निरीक्षकाचा रिपोर्ट शनिवारी निगेटीव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. शहरात आतापर्यंत एकूण सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

चौकीत आणलेल्या गुन्हेगाराला कोरोना; पाच पोलीस क्वारंटाईन

भांडणाच्या प्रकरणात शहरातील एका पोलीस चौकीत आणलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मे रोजी दोन भावंडाचा घरगुती वाद पोलीस चौकीपर्यंत पोहोचला.

19 मे रोजी दोन भावंडाचा घरगुती वाद पोलीस चौकीपर्यंत पोहोचला. पोलीसांनी एकाची अदखलपात्र तक्रार घेतली. तर, दुसऱ्याला नोटीस बजावत समजूत काढून घरी पाठवून देण्यात आले. यापैकी, एकाला दुसऱ्या दिवशी सर्दी आणि खोकला झाल्याने तो औंध येथील जिल्हा रुग्णालयात गेला. तपासणीत 21 मे रोजी त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button