पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले पाच नवे कोरोनाबाधित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1-20.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. आज दिवसभरातर कोरोनाच्या 14 रुग्णांची नोंद झाली. पैकी पाच नवे रुग्ण पिंपरी-चिंचवड या भागात आढळून आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातून दुबईला गेलेल्या तिघांचे रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाच्या कुटुंबातील चार जण आणि परदेशवारी केलेल्या एक अशा पाचजांचे रिपोर्ट आज रात्री पॉसझिटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित देशातून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या 31 जणांची माहिती प्रशासनाकडे आहे. या लोकांच्या कुटुंबातील आणखी संशयित 41 जणांचे नमुने एनआयव्ही कडे शुक्रवारी पाठवण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचे रिपोर्ट शनिवारी रात्री पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली असून, संबंधित रुग्णांना भोसरी येथील रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.