breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील 5 हजार व्यक्तींचे होणार सार्स कोवी सर्वेक्षण

पिंपरी | महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅण्टीबॉडीज चाचणी म्हणजेच ‘सार्स कोवी – 2 सर्वेक्षण’ करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या आठ दिवसांपासून कामाला प्रत्यक्ष सुरूवात केली असून त्यामध्ये 5 हजार व्यक्तींच्या रक्त नमुन्यांची शास्त्रीय तपासणी केली जाणार आहे. या सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.  

पिंपरी-चिंचवडमधील किती लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी किती लोकांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. याची माहिती घेण्यासाठी हा सर्वे करण्यात येत आहे. त्याचे काम शहरात सुरु झाले आहे. या पथकाला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे. ते काही प्रश्न भरुन घेतील. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक प्रश्न विचारले जाणार नाहीत. केवळ वैद्यकीय बाबतीत प्रश्न विचारणार आहेत.

रक्ताचे नमुने घेणार आहेत. स्वॅब घेतला जाणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हा सर्व्हे होईल, त्या नागरिकांनी सहकार्य करावे. पाच हजार सॅम्पल सर्वे आहे. मोठा सर्वे आहे. आठवड्याभरापूर्वी सर्वे सुरु झाला आहे. त्याला महिना ते दीड महिना लागेल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. कोरोना विरोधाच्या लढ्यात सार्स कोवी – 2 सर्वेक्षण हे एक महत्वाचं अस्त्र ठरणार आहे. कोरोनाचे संकट नेमके कुठवर फैलावले आहे, याची माहिती याद्वारे मिळणार आहे, अशी माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button