पिंपरी-चिंचवडमधील रेशन दुकानदारांचे ऑडिट करा : विनोद कांबळे
पिंपरी| प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष विनोद कांबळे यांनी भेट घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांनी गोरगरीब जनतेला धान्य वाटपामध्ये खूप मोठा काळाबाजार गैरव्यवहार झालेला असून प्रत्येक रेशन दुकानांचे दिलेला माल वाटप केलेला मालक व शिल्लक राहिलेला महाल या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये दुकानांचे ऑडिट करण्यात यावे. त्याची चौकशी व्हावी व दोषी असणाऱ्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विनोद कांबळे म्हणाले की, शासनाकडून आलेले धान्य,वाटप केलेले धान्य, शिल्लक राहिलेले धान्य.
अनेक रेशनकार्डधारक कोरोनाच्याभितीमुळे मुळ गावी गेले असल्याने त्यांच्या नावावरील धान्ये काळाबाजाराने विक्री केलेली आहे. त्यामुळे अनेक रेशनकार्ड लाभार्थी शासनाच्या धान्यापासून वंचित राहिलेले आहे, धान्य वाटप करताना कुणालाही पावती दिली गेलेली नाही.
सरकारमान्य स्वस्त धान्य कोणत्या योजनेअंतर्गत धान्य काही आलेले आहे साधा फलक सुद्धा लावण्यात आलेला नव्हता दुकानदाराने मोफत आलेले चनादाळ, तांदूळ हे ज्यादा रकमेने धान्याची विक्री सुद्धा केलेली आहे. त्यामुळे दोषी असणाऱ्या रेशन दुकानदार आवर्ती कारवाई करून त्यांचे दुकान परवाने रद्द करावी
अजित पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले, असल्याचे महाईन्यूजच्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यांनी सांगितले.
सदर निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष महेश झपके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार विभाग शहराध्यक्ष किरण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सरचिटणीस अभिजीत आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल शेर संघटिका सुप्रिया साळवे काटे, प्रभाग क्रमांक तीस अध्यक्ष सुलेमान मामू शेख, राष्ट्रवादी काँग्रेस विशाल घोगरेसह पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.