breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांचा कोरोना रिपोर्ट ‘निगेटिव्ह’

पिंपरी । पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा वाढलेला प्रसार तसेच काही सहकारी नगरसेवकांना झालेली कोरोनाची लागण यामुळे महापौर माई ढोरे यांनी स्वतःची कोरोना तपासणी करून घेतली. त्याचा रिपोर्ट रविवारी (दि. ५) रात्री उशिरा प्राप्त झाला. महापौर ढोरे यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून महापौर माई ढोरे या वयाच्या ६० व्या वर्षी सुद्धा अहोरात्र कार्यरत आहेत. विशेषतः वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध रुग्णालयांशी बोलणी करून त्यांच्याशी उपचारांबाबत करारनामे करणे, शहराच्या विविध भागांतील कोरोनाग्रस्त आणि कंटेन्मेंट भागाची पाहणी करणे, उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेणे, त्यादृष्टीने आर्थिक तरतुदींपासून शहरातील सर्व वैद्यकीय व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापौर ढोरे आजही प्रचंड कष्ट घेत आहेत.

त्याचबरोबर सातत्याने रुग्णालयांना भेटी देणे, पिंपरी-चिंचवडसह पुण्यात विविध मंत्र्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकांमध्ये सामील होणे, स्वतः अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेणे, काही सूचना करणे, शहरातील आमदार, महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून निर्णय घेणे अशी त्यांची दिनचर्या आजही सुरुच आहे. कोरोनाच्या संकटकाळातही महापौर माई ढोरे यांचे महापालिकेतील दैनंदिन कामे सुद्धा सुरूच आहेत. अनेक नागरिक त्यांना भेटायला येतात. त्यांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याबरोबरच महापालिकेच्या कामांवरही देखरेख त्या ठेवत आहेत. पदाधिकारी व अधिकाऱ्यांसोबत नाला सफाई आणि पावसाळा पूर्व कामांचीदेखील त्यांनी पाहणी केली.

या सर्व पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दिवंगत दत्ता साने, भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे, शैलेश मोरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. महापौर माई ढोरे या पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत पुण्यातील अनेक बैठकांमध्ये सहभाग घेतला होता. दोघांनीही शेजारी बसून अनेक विषयांवर चर्चा केली होती. अशा स्थितीत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खबरदारी म्हणून महापौर माई ढोरे यांनीही स्वतःची कोरोना तपासणी करून घेतली.

त्यांच्या स्वॅबचे (घशातील द्रव) नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट रविवारी (दि. ५) रात्री उशिरा प्राप्त झाला. महापौर माई ढोरे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. काळ वाईट असल्यामुळे “मी काळजी घेऊनच रोजची दिनचर्या पार पाडत असून माझ्या सर्व पिंपरी-चिंचवडकरांनीही माझ्यापेक्षा अधिक काळजी घ्यावी”, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, फार महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, तोंडाला मास्क लावल्याशिवाय घराबाहेर जाऊ नका, बाहेर प्रत्येकाशी बोलताना ६ फुटाचे अंतर ठेवूनच बोला, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, ऑफिसमध्ये कामाला जात असाल तर तेथेही नियमांचे पालन करा, सतत हात धुवत राहा किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करा, घरात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले असतील तर फार काळजीपूर्वक वागा, हे दिवस सुद्धा जातील पण प्रशासनापेक्षा आपणच आपली काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी पिंपरी-चिंचवडकरांना केले आहे.   

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button