पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने ‘आयएएस’ अधिकारी महेश गिते यांचा सत्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/21987291-2880-4d2d-bbee-856522db2932.jpg)
उपमहापौर तुषार हिंगे, राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांची उपस्थिती
पिंपरी । जामखेड तालुक्यातील मोहरी येथील शेतकऱ्याचा मुलगा महेश गीते पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस झाला. त्याच्या या यशाने गीते कुटुंबासह गावची व तालुक्याची मन उंचावली आहे. यानिमित्त् पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने उपमहापौर तुषार हिंगे आणि राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार यांनी सत्कार केला.
यावेळी जांबे येथील युवा नेते अनुप गायकवाड, चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भांडवलकर, उद्योजक किरण जगताप आदी उपस्थित होते.
मोहरी येथील बाबासाहेब व सोजरबाई गिते या दाम्पत्याच्या कुटुंबातील मनीषा, महेश आणि मंगेश अशी तीन भावंडे आहेत. यापैकी मनीषा सैनिक तुकाराम मिसाळ यांच्याशी विवाहबद्ध झालेली आहे. छोटा भाऊ मंगेश कला शाखेचा पदवीधर आहे. महेश ने बीएससी ऍग्री पर्यंतचे शिक्षण घेतले आणि वयाच्या 25 व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला. महेश याला मिळालेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
यावेळी
महेश गिते म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांनी न घाबरता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षाची तयारी केली पाहिजे. प्रामाणिकपणे प्रयत्न केला, तर यश निश्चित मिळतं. मी सलग तीन वर्षे सातत्याने, प्रामाणिकपणे अभ्यास केला. मला पहिल्याच प्रयत्नात आय.ए.एस. होण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी स्वतःला कमी न समजता कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे.