Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

पिंपरी – एका २३ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पिंपरी आणि मुंबई या ठिकाणी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मार्च ते २७ मे २०१९ या कालावधीत घडली.

या प्रकरणी पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विशाल नवलकिशोर बुंदे (रा. संतोषी माता को ऑप, हौसिंग सोसायटी, मुंबई सेट्रल) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल आणि पीडित तरूणी यांची तीन महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. यापूर्वी दोघांच्याही कुटुंबांची ओळख होती. सोशल मिडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे पुढे मैत्रीत रुपांतर झाले. मैत्रीचे पुढे प्रेमात रुपांतर होऊन सुखी संसारासह सात जन्म एकत्र राहण्याच्या शपथा घेण्यात आल्या.

दरम़्यानच्या कालावधीत विशाल याने पिंपरी व मुंबई येथील हॉटेलवर पीडितेला नेऊन वारंवार बलात्कार केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख अधिक तपास करत आहेत

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button