breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरीत भाजप नगरसेवकाची बंडखोरी, शिवसेना-राष्ट्रवादी-वंचितमध्ये तिरंगी लढत

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवाराविरोधात भाजपच्या नगरसेवकांने बंडखोरी केली आहे. मात्र, भाजप-शिवसेना मित्रपक्ष महायुतीचे अॅड गाैतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी-काॅंग्रेस आघाडीचे आण्णा बनसोडे आणि वंचितचे बाळासाहेब गायकवाड यांच्यात तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.

पिंपरी विधानसभेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी, बसपा, वंचित, बहूजन मुक्ती पार्टी या पक्षासह अपक्ष असे एकूण 18 उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. दरम्यान, भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी केलेली बंडखोरी थोपवण्यास महायुतीच्या नेत्यांना अपयश आल्याने त्याचा फटका शिवसेनेला निश्चित बसणार आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. या मतदारसंघातून भाजप-शिवसेना-आरपीआय महायुती, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीतील अनेक इच्छुकांनी बंडखोरी केली होती. त्या बंडखोरांना त्या-त्या पक्षातील नेत्यांना थोपवण्यास यश मिळाले आहे. यामुळे पक्षाची संभाव्य होणारी मत विभागणी थांबणार आहे. महायुतीतून बंडखोर उमेदवार असलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, उत्तम हिरवे, भिमा बोबडे तर आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी उमेदवारी माघारी घेतली. तर महाआघाडीतून बंडखोर उमेदवार राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर, शेखर ओव्हाळ आणि काँग्रेसचे मनोज कांबळे, राजू बनसोडे, सुंदर कांबळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यासह अपक्ष असलेले विजय रंदिल, संदिपान झोंबाडे,सतिश भवाळ, गौरीशंकर झोंबाडे यांनीही अर्ज मागे घेतले आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील एकुण ३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये एकूण १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने १८ उमेदवारच निवडणूक रिंगणात कायम आहेत.

हे आहेत उमेदवार

राष्ट्रवादीचे आण्णा बनसोडे ( घड्याळ), शिवसेनेचे अॅड गाैतम चाबुकस्वार (धनुष्यबाण), बसपाचे धनराज गायकवाड (हत्ती), बहूजन मुक्तीचे गोविंद हेरोडे (खाट), वंचितचे बाळासाहेब गायकवाड (गॅस सिलेंडर), भारतीय धर्मनिरपेक्षचे संदीप कांबळे (ब्रेड) तर अपक्ष म्हणून अजय गायकवाड, अजय लोंढे, मुकूंद ओव्हाळ, चंद्रकांत माने, दिपक जगताप, दिपक ताटे, नरेश लोट, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, मिनाताई खिलारे, युवराज दाखले, डाॅ. राजेश नागोसे, हेमंत मोरे हे उमेदवार रिंगणात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button