पिंपरीत तरुणीवर बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
![Dr. Poonam Nighute commits dowry against her husband in suicide case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/nashik_crime-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करुन तिचे अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच तरुणीच्या मोबाईलमध्ये इतर मुलांचे फोटो पाहून आरोपीने तरुणीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
गजानन शामराव सूर्यवंशी (23, रा. भोकर नूतन शाळेजवळ, नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी अल्पवयीन असतानाही आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. फिर्यादीचे अश्लील फोटो, व्हिडिओ तयार केले.
दरम्यान, फिर्यादीच्या मोबाईलमध्ये इतर मुलांचे फोटो पाहून ‘तु इतर मुलांशी का बोलतेस’ असे म्हणत तिच्या पोटात, डोक्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर तिला बेशुद्ध अवस्थेत रूममध्ये सोडून तिचा मोबाईल व गाडी घेऊन आरोपी निघून गेला. तसेच तिच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियावर फिर्यादीचे अश्लील फोटो व व्हिडिओ शेअर केले.