Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, चिमुकल्यासह तिघे जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/2-2.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने तेरा वर्षीय चिमुकल्यासह तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना भोसरीतील संत तुकाराम नगर बुधवारी (ता. 4) सकाळी घडली.
या घटनेत घरातील एक महिला गंभीर जखमी असून एक पुरुष व तेरा वर्षीय मुलगा किरकोळ जखमी आहेत. मोठा आवाज झाल्याने शेजारील रहिवाशांनी स्फोट झालेल्या घराकडे धाव घेतली. जखमी अवस्थेत घरात पडलेल्या तिघांनाही उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी दवाखान्यात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले.