breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीत कोरोनाचे ३ रूग्ण ‘ठणठणीत’, महापौरांकडून प्रशासनाला ‘शाब्बासकी’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. महापालिकेने सर्व पातळीवर केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १४ दिवसानंतर २४ तासांच्या फरकाने यातील तीन रुग्णांचे तपासणीसाठी नमुने घेऊन पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले. या तिनही रुग्णांच्या दोन्ही चाचण्या हया निगेटिव्ह आल्यामुळे व छातीच्या एक्स रे तपासणीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वैद्यकिय पथकाने घेतलेल्या परिश्रमास यश प्राप्त झाले असून या सर्व पथकाचे आणि यंत्रणेचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी कौतूक केले.

चव्हाण स्मृति रुग्णालय पदव्युत्तर संस्थेमध्ये कोविड – १९ विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉड) कार्यान्वित करण्यात आलेला आहे. यामध्ये संशयित व कोविड – १९ पॉझिटिव्ह रुग्णांची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ११ मार्च रोजी तीन रुग्ण कोविड – १९ पॉझिटिव्ह असलेले विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. भारत सरकारच्या कोविड – १९ डिस्चार्ज धोरणानुसार १४ दिवसानंतर २४ तासांच्या फरकाने वरील तीन रुग्णांचे तपासणीसाठी नमुने घेऊन पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले. या तिनही रुग्णांच्या दोन्ही चाचण्या हया निगेटिव्ह आल्यामुळे व छातीच्या एक्स रे तपासणीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी तिन्ही रुग्णांनी रुग्णसेवेबाबत समाधान व्यक्त केले.

या तिनही रुग्णांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन पुढील चौदा दिवस घरामध्येच रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच आरोग्यासंबंधी कोणताही त्रास उद्भवल्यास पुढील वैद्यकिय उपचारांकरिता तात्काळ महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत संपर्क साधण्याचा सल्ला त्या तिनही रुग्णांना देण्यात आलेला आहे. रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी सोडतेवेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके तसेच नगरसदस्य एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत लाठी, मेडिसीन विभागप्रमुख डॉ . प्रविण सोनी व सहयोगी प्राध्यापक डॉ . किशोर खिलारे, डॉ. निरंजन पाठक व डॉ. नरेंद्र काळे तसेच यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, मेट्रन मोनिका चव्हाण, स्टाफनर्स शोभा तळेकर, अमिता सालगुंडी, सुनिता हाके, विजया बिचकुले, पंचशीला कांबळे यांच्यासह सर्व स्टाफनर्स व वॉर्ड बॉय आदी रुग्णसेवेत कार्यरत होते. सध्या रुग्णालयात कोरोना बाधित असलेल्या एका रुग्णाची प्रकृती देखील स्थिर असल्याचे उपचार करणा-या मेडिसीन विभागप्रमुख डॉ. प्रविण सोनी यांनी माहिती देताना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button