breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीतून सुलक्षणा धर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी, इच्छुकांचा आपेक्षाभंग

पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी

पिंपरी विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादीची उमेदवारी नगरसेविका सुलक्षणा धर यांना जाहीर झाली आहे. माजी आमदार आण्णा बनसोडे आणि इच्छुक असलेले माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा पक्षाकडून आपेक्षाभंग झाला आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघातून सेलीब्रेटीला राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यात उत्कर्ष शिंदे यांना उमेदवारी देण्याची चर्चा होती. त्यांनी नामनिर्देशन पत्र घेतले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच सस्पेन्स वाढला होता. शिवाय, माजी आमदार आण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा होती. दोघांनी जोरात प्रचाराला सुरूवात केली होती.

मात्र, राष्ट्रवादीने दुस-या यादीत पिंपरी मतदार संघातून सुलक्षणा धर यांचे नाव जाहिर केले. त्यामुळे नाराज झालेले आण्णा बनसोडे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी तात्काळ पत्रकार परिषद बोलावली आहे. आज साडेतीन वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. तर, आता शेखर ओव्हाळ कोणती भूमिका घेतात, हे लवकरच समोर येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button