पिंपरीतील शिवाजी महाराज स्मारकाचे नुतनीकरण आणि भैरवनाथ मंदिर जिर्णोध्दाराचे काम मार्गी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/IMG-20190306-WA0005.jpg)
- नगरसेविका उषा वाघेरे यांचा पाठपुरावा
- दोन्ही कामाच्या निविदा झाल्या प्रसिध्द
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे नुतनीकरण आणि श्री काळभैरवनाथ मंदिराचा जिर्णोध्दार ही दोन्ही कामे लवकरच मार्गी लागणार आहे. त्या कामासाठी अनुक्रमे 83 लाख 10 हजार आणि 5 कोटी 81 लाख 28 हजार रुपये खर्चाच्या दोन वेगवेगळ्या निविदा प्रसिध्द झाल्या आहेत.
पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे नुतनीकरण आणि श्री काळभैरवनाथ मंदिराचा जिर्णोध्दार करण्यासाठी नगरसेविका उषा वाघेरे यांनी पाठपुरावा केला. त्याला यश आले असून या दोन्ही कामाच्या निविदा प्रसिध्द झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे नूतनीकरण करण्यासाठी 83 लाख 10 हजार 333 एवढ्या रक्कमेची निविदा प्रसिध्द झाली आहे. तर, श्री काळभैरवनाथ मंदिर जिर्णोध्दारासाठी 5 कोटी 81 लाख 28 हजार 982 एवढ्या रक्कमेची निविदा प्रसिध्द झाली आहे, अशी माहिती नगरसेविका उषा वाघेरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
दोन्ही कामांसाठी नगरसेविका वाघेरे यांनी मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा केला. १९ डिसेंबर २०१४ रोजी तत्कालीन आयुक्तांना प्रभाग दौऱ्यामध्ये ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून या दोन्ही कामांमुळे पिंपरी गावच्या वैभवात भर पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन स्मारकांमध्ये रायगडावरील सिंहासनाधिष्ठीत पुतळयाची प्रतिकृती बनविण्यात येणार आहे. आकर्षक मेघडंबरी बसविण्यात येणार आहे. तसेच, भैरवनाथ मंदिर नव्याने बांधून, आता ते काळया दगडी कामांमध्ये, आकर्षक स्वरूपात बांधण्यात येणार आहे, अशी माहिती वाघेरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.