breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीतील रेल्वे उड्डाण पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिटसह दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायीकडून तहकूब

मे. हरक्युलेस स्ट्रक्चरल सिस्टीम प्रा. लि. या ठेकेदाराकडून करणार होते काम

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी शहरातील ३२ वर्षे जुन्या इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पुलाचे संरक्षक कठडे ठिकठिकाणी ढासळू लागले आहेत. महापालिकेच्या बीआरटी विभागाने या पुलाचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करुन दुरुस्ती करण्याच्या प्रस्ताव आज (बुधवारी) स्थायी समितीने तहकूब करण्यात आला आहे.

हा रेल्वे उड्डाणपूल साधारणता १९८५-८६ च्या सुमारास बांधण्यात आला. रोज या पुलावरुन चारचाकी, दुचाकी मिळून हजारो वाहने ये-जा करीत असतात. पिंपरीतील मुख्य बाजारपेठेला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. या पुलाच्या संरक्षक कठड्यांची दुरवस्था झालेली असून संरक्षक कठडे तुटलेले आहे. काही ठिकाणी कठड्यातील लोखंडी सळयाच स्पष्ट दिसतात. तशीच अवस्था पुलाच्या इतर बाजूंनाही आहे. पुलावरून भाजी मंडईकडे उतरणारा आणि दुसऱ्या बाजूने भाजी मंडईकडून पुलाकडे जाणाऱ्या जिन्याचे सिमेंट गायब झाल्याने तो धोकादायक झाला आहे. अनेक व्यावसायिकांनी अनधिकृतपणे अर्धे पक्के बांधकाम, अर्धे पत्र्याचे मिळून दुकाने थाटली आहेत.

दरम्यान, गांधी रेल्वे उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडीट करणे, दुरुस्ती करण्यासाठी मे. हरक्युलेस स्ट्रक्चरल सिस्टीम प्रा. लि. यांनी 8 कोटी 27 लाख 48 हजार 956 रुपये यामधून काही चार्जेस वगळून 8 कोटी 25 लाख 48 हजार 958 रुपये वर निविदा दर मागविणेत आले आहेत. त्या सदरील ठेकेदाराकडून 8 कोटी 25 लाख 48 हजार 958 रुपयापेक्षा 1.90 टक्के कमी दराने निविदा प्राप्त झालेली आहे. सन 2018-19 चे एस.एस.आर दरानूसार प्राप्त निविदा दराने स्विकृत योग्य दरापेक्षा 3.02 टक्के कमी येत असल्याने प्राप्त निविदा मंजूर दराने म्हणेज 8 कोटी 11 लाख 45 हजार 587 पर्यंत काम करुन घेणेस व नियमानूसार व निविदेतील अटीप्रमाणे वाढ व घट दरानूसार फरकाची रक्कम अदा व वसुल करण्यास बंधनकारक राहील. त्या प्रस्तावास आज स्थायी समितीने मान्यता न देता हा विषय तहकूब ठेवला आहे.

खासगी संस्थेकडून पुलाची पाहणी पूर्ण
लांबी – 815 मीटर
रुंदी – 6.5 मीटर
बांधकाम वर्ष – 1985-86
अंदाजे आयुष्यमान 35 ते 40 वर्षे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button