breaking-newsपिंपरी / चिंचवड

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कामे करा: विरोधी पक्षनेते नाना काटे

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग चालू आहे. कोरोना बाधित रुग्ण शहरातील वेगवेगळ्या भागात सापडत आहेत. या अनुषंगाने पूर्ण देशभरात  ३ मे पर्यंत  संचारबंदी (लॉक डाऊन) लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या विरोधात मनपा युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे, शहरात नागरीकांचे सर्वेक्षण करणे, बेघर,बेरोजगार नागरीकांना जेवण पुरविणे नागरीकांमध्ये कोरोना विरोधात जनजागृती करणे इत्यादी प्रयत्न करीत आहे.

परंतु, आता पावसाळा तोडावर आलेला आहे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नियमित शहरात होणारी   विविध कामे प्रलंबित आहेत. उदा. शहरातील छोटे मोठे नाले साफसफाई करणे, शहरातील रस्ते खाजगी कंपनींच्या केबल्स टाकण्यासाठी खोदाई करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे ठिकठिकाणी कच-यांचे ढीग ठिकठिकाणी साठलेले आहेत, ते पावसाळा सुरु होण्यापूर्वी हटविणे गरजेचे आहे. जलनिस्सारण नलिका टाकण्याची कामे जिथे अर्धवट झालेली आहेत ती पूर्ण करणे, गटारे साफसफाई करणे, तसेच ऐन पावसाळ्यात वाढलेल्या झाडांच्या फांद्या महावितरणच्या लाईनवर पडून विद्युत पुरवठा खंडीत होणे, वाहतूक विस्कळीत होणे वेळप्रसंगी अपघात होऊन वित्त व जिवित हानी होण्याची शक्यता असते त्यामुळे  शहरातील वाढलेल्या झाडांची छाटणी करणे. इत्यादी मान्सूनपूर्व कामे पावसाळा सुरु होणेपूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीमध्ये संचारबंदी १७ मे पर्यंत असली तरी शहरातील कोरोना विषाणू संसर्गाची परीस्थिती पाहता पिंपरी चिंचवड शहरामध्ये संचारबंदी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचारबंदी असली तरी सदरची मान्सूनपूर्व कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा शहरातील नागरीकांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गंत प्रलंबित असणारी कामेही मार्गी लावण्यात यावीत.

       तरी आपणांस विनंती आहे की, पावसाळा सुरु होण्यापूर्वी दरवर्षीप्रमाणे मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यात यावीत. म्हणजे पावसाळ्यामध्ये नागरीकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button