Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
पावसाची सुध्दा, मी पुन्हा येणार… मी पुन्हा येणार…!
![Two children were seriously injured when letters fell on the house](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/821199-rains.jpg)
- पुण्यासह पिंपरी-चिंचवडला पावसाने सोमवारी झोडपले
- आणखी वादळासह कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसराला आज सोमवारी (दि. 4) पावसाने झोडपून काढले. सायंकाळी साडेचारवाजता पावसाला सुरूवात झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रात्री सुद्दा जोरात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर सुरू झाला तरी पाऊस थांबायचे नाव घेत नाही. त्यातच 5 नोव्हेंबर नंतर वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार आज सायंकाळी पाचनंतर वादळासह पावसाला सुरूवात झाली. पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात जोरात पाऊस झाला. रात्री सुध्दा जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज पडलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. तर, जिल्ह्यातील शेतक-यांच्या अतिवृष्टीमुळे होणा-या नुकसानीत आणखीण भर पडली. त्यामुळे हा पाऊस एकदाचे कधी थांबतो, याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.